Wednesday, 23 April 2014

एक दिवस पुन्हा जगायचंय…

मनसोक्त झोपून एकदा उठायचंय,
मनसोक्त रडून एकदा हसायचंय,
मनसोक्त डुंबून एकदा पोहायचंय,
न पीता एक दिवस पुन्हा जगायचंय…

भरलेला घडा,
फुटणार आज ना उद्या !
आलेला पूर,
बुडवणार आज ना उद्या !
सुटलेला वारा,
संपलेला दिवस,
घेऊन जाणार आज ना उद्या !

म्हणून,
मनसोक्त दमून एकदा खेळायचंय,
मनसोक्त थांबून एकदा चालायचंय,
मनसोक्त बसून एकदा बोलायचंय,
अंन न पीता एक दिवस पुन्हा लिहायचंय…

गुदमरलेला श्वास,
रुसणार  आज ना उद्या !
आलेले नशिब,
भोग देणार आज ना उद्या !
जोडलेली नाती,
भावनांची शेती,
हरवुन जाणार आज ना उद्या !

म्हणून!
न पीता एक दिवस मना संगे उडायचंय,
न पीत एक दिवस फक्त तुझ्या सोबत फुलायचंय,
न पीता एक दिवस पुन्हा जगायचंय…    

No comments:

Post a Comment