Wednesday, 25 December 2013

चलो कल को आज बनाये, आज नही तो कल तो …

चलो कल को आज बनाये,
चलो कल को आज बनाये,
आज नही तो कल तो …

बरीस्ते मै फुल खिलेंगे,
आज नही तो कल तो!
पुरे होंगे सबके अरमान,
आज नही तो कल तो!
आंसू भी जम जायेंगे पलक पे,
आज नही तो कल तो!
रुठे दिलोको फिर मिलये,
आज नही तो कल तो!

चलो कल को आज बनाये,
आज नही तो कल तो …

जो बनी नही ओ बात बन जाये,
आज नही तो कल तो!
ढले दिन मै कही चिराग जल जाये,
आज नही तो कल तो!
सिर्फ आहट नही कुछ महसूस भी हो,
आज नही तो कल तो!
फिर जिंदगी की सहर हो जाये,
आज नही तो कल तो!

चलो कल को आज बनाये,
आज नही तो कल तो …

धूप भी रहे और थोडी छाव भी,
बेरंग भी रहे और थोडा रंग भी,
बेगाने भी रहे और थोडे अपने भी,
कम से कम कुछ तो रहे,
आज नही तो कल तो!  

चलो कल को आज बनाये,
आज नही तो कल तो …

Tuesday, 24 December 2013

होऊ देत रिकामं थोडं पावलांचं ऒझ …

होऊ देत रिकामं थोडं पावलांचं ऒझ … 

मावळत्या किराणा सोबत,
पाखरांच्या घरट्या सोबत,
नदीच्या विसावलेल्या किनाऱ्या सोबत,
अंन श्वासातल्या हरएक घोटा सोबत,
होऊ देत रिकामं थोडं पावलांचं ऒझ … 

आईच्या हाथाची चव अजून ही तशीच,
बाबाच्या एका बोटाचा आधार अजून ही तसाच,
मैत्रीच्या ओलाव्याची ओढ ही तशीच ,
आपल्यांच्या विरहाचा बंध ही तसाच,
मग होऊ देत रिकामं थोडं पावलांचं ऒझ …

अजूनही चाखणारी पावसाचे थेंब धरा तशीच,
खाळोखात आनंदी नाचणारा काजवाही तसाच ,
गन्धानी मधहोश होणारा भवरा ही तसाच ,
दिव्या सोबत अजूनही फक्त जळणारा परवाना तसच…
मग होऊ देत रिकामं थोडं पावलांचं ऒझ …

पण का आज कमवायची ओढ हि तशीच,
का दूर देशी रमण्याचा ध्यास हि तसाच,
का कोण आहे कोण गेले विचार नाही कसलाच,
का मी आहे अन राहणार तसाच…
मग होऊ देत रिकामं थोडं पावलांचं ऒझ …

आठवणीतल्या बाबा सोबत,
हरवणाऱ्या आई सोबत,
पावसाच्या हरएक थेंबा सोबत,
अंन जगलेल्या प्रत्येक क्षणा सोबत,
होऊ देत रिकामं थोडं पावलांचं ऒझ …

बस एक इबादत रहे, कोई खुदा नही … जाना वहा है…

बस एक इबादत रहे, कोई खुदा नही … जाना वहा है… 

बस एक अहसास रहे होश नही,
बस एक पल रहे उमीद नही ,
बस एक सुकून रहे आह्टे नही,
और एक आशिया रहे कोई काफिला नही! 
जाना वहा है… 

मंजिल से कभी राहे रुक्सत ना हो,
ख्वाबो से कभी पलके खाली ना हो ,
रातो से कभी दिन की शिकायत ना हो,
और शमा कि कभी परवाने से दूरिया ना हो!
जाना वहा है…

हवा भी मसरूफ रहे जमाने मै,
नाश भी चडता रहे हर एक पैमाने मै ,
चाहते भी बडती रहे सारे अफसानो मै,
और मस्ती उही हसती रहे हर एक अरमानो मै!
जाना वहा है…

बस एक खुशबू रहे फासले नही,
बस एक धडकन रहे कोई शिकायत नही,
बस एक रोशनी रहे अंधेरा नही,
और बस एक इबादत रहे कोई खुदा नही … जाना वहा है…
और बस एक इबादत रहे कोई खुदा नही … जाना वहा है…

काय आहे खोल मनात ते शोधतोय आजही।

काय आहे खोल मनात ते शोधतोय आजही। 

मीठ ही आहे अंन भाकर पण ,
पैका ही आहे अंन आराम पण ,
सुख ही आहे अंन भाग्य पण,
प्रेम ही आहे अंन आधार पण … 

काय आहे खोल आत जे खातंय आजही!
काय आहे खोल काळजात जे टोचतंय आजही!
काय आहे खोल डोळ्यात जे सलतंय आजही !
काय आहे खोल श्वासात जे गुदमरतय आजही !

काय आहे खोल मनात ते शोधतोय आजही।

वाहतेय वाऱ्याची छान झुळूक,
पडतेय चंद्राची छान उब ,
नाचतेय झाडांची छान सावली,
सजतेय काजव्यांची छान रांगोळी …

मग काय आहे खोल आसवात जे बरसते आजही !
मग काय आहे खोल पावसात जे तहानते आजही!
मग काय आहे खोल पंखात जे तुटते आजही!
मग काय आहे खोल मनात ते शोधतोय आजही।

तरीही काय आहे खोल सावल्यात जे सतावते आजही…
काय आहे खोल मनात ते शोधतोय आजही…

मन ! पहातोय वाट तुझ्या येण्याची...

मन !
पहातोय वाट तुझ्या येण्याची … 

बोलक्यातल्या तुझ्या एका दाता सोबत ,
मनसोक्त हसण्याची !
थांबत नाहीत तुझे आंसू म्हणून ,
पोठभर रडण्याची !
थांबणार नाहीत श्वास तुझे ,
म्हणून आयुष्यभर खेळण्याची!
अंन इवल्याश्या पावलांन सोबत,
नवीन दुनिया जगण्याचे …

मन !
पहातोय वाट तुझ्या येण्याची …

ना तू झोपताच,
लागणार ओढ तुझ्या उठण्याची !
ना तू बोलतच ,
लागणार ओढ dadda म्हणण्याचे !
ना तू शोधताच ,
लागणार ओढ नाती जोडण्याची !
ना तू हरवताच स्वप्न ,
लागणार ओढ पुर्ण करण्याचे !

मन !
पहातोय वाट तुझ्या येण्याची …

बोलक्यातल्या तुझ्या एका दाता सोबत ,
मनसोक्त हसण्याची !
थांबत नाहीत तुझे आंसू म्हणून ,
पोठभर रडण्याची !
थांबणार नाहीत श्वास तुझे ,
म्हणून आयुष्यभर खेळण्याची!
अंन इवल्याश्या पावलांन सोबत,
नवीन दुनिया जगण्याचे …

मन !
पहातोय वाट तुझ्या येण्याची …

देखे हुये ख्वाबो को, एक बार फिर जगाणा है…

बस भुले ना ये जहां,
कुछ ऐसा कर जाना है … 
देखे हुये ख्वाबो को,
एक बार फिर जगाणा है… 

आंसू ना आये किसीके पलक पे कभी, 
सुकून दिलो मे उतना सजाना है! 
फासले ना रहे किसीके मंजिल तक कभी, 
कुछ राहे ऐसी बनाना है 
आहट ना हो किसीको गम की कभी 
आशियाना ऐसा सवारणा है

बस भुले ना ये जहां,
कुछ ऐसा कर जाना है …
देखे हुये ख्वाबो को,
एक बार फिर जगाणा है…

आयुष्याच्या बेरजेत बाकी काहीच उरत नाही …

आयुष्याच्या बेरजेत बाकी काहीच उरत नाही … 

पाहिजे काय,
कळत काहीच नाही!
करतोय काय,
समजत काहीच नाही!
होणार आहे काय,
माहीत काहीच नाही!
अंन आयुष्याच्या बेरजेत बाकी काहीच उरत नाही … 

लागतय थोडंच,
तरीपण पोट भरत नाही !
चुकलाय रस्ता ,
तरीपण वाट सुटत नाही !
तुटली नाती ,
तरीपण दुश्मनी संपत नाही !
अंन आयुष्याच्या बेरजेत बाकी काहीच उरत नाही …

कळतंय खूप काही,
पण वळत काहीच नाही !
केलेत खूप वार त्यांनी,
तरीपण लोकांच दुखं उमजत नाही !
ऐकू येते हाक गावाची ,
तरीही पाय वळत नाहीत !
अंन आयुष्याच्या बेरजेत बाकी काहीच उरत नाही …

बेटी मेरी …

बेटी मेरी …

हसती है हसाती है,
रोती है रुलाती है,
बिखरती है साम्भालती है,
बचकाने काम करती है,
पर जो भी है,
मां का दर्द समझाती है और पापा से प्यार करती है…

बेटी मेरी … 
सिखती है सिखाती है,
ठूकराती है अपनाती है,
गिरती है गीराती है,
गीराके फिर उठाती है,
पर जो भी है,
लता के गीत गाती है और सचिन से प्यार करती है,

बेटी मेरी …
हर एक के मन को भाती है,
हर एक सपना जगाती है,
पत्ते के महल बनाती है,
बनाके और सजाती है,
पर जो भी है,
दुनिया का दर्द समजती है और इंसान से प्यार करती है…

बेटी मेरी …
अब…
रुसवा है खामोश है,
और जान के भी अनजान है,
नये रासते है मंजिले है,
और बाकी भी कई अरमान है,
पाना है छूट जाणा है,
और रिश्ते को भी भुलाना है,
पर जो भी है,
मां का दर्द समझाती है और पापा से प्यार करती है…
 

तरीही आपल्याच सावल्यांना का शोधतेस तू…


बसलोच लिहायला कधी,
तर दिसतेस तू, 
बदलताच श्वास माझे,
तर हसतेस तू, 
थांबलोच चुकून कधी,
तर रुसतेस तू, 
हरवताच शब्ध माझे,
तर आठवतेस तू, 
तरीही आपल्याच सावल्यांना का शोधतेस तू… 

भरलीच भावनांची ओंजळ कधी,
तर देते साथ आसवांची ,
तुटलीच आपल्यांची नाळ कधी,
तर देते उब मायेची,
विरताचा नशिबाचे भोग कधी,
तर देते जिद्द जगण्याची,
तरीही आपल्याच पावलांना का शोधतेस तू…

झुळूक येताच गंधाची,
रमवते माझ्या मनाला,
वादळाची होताच सकाळ,
आवळते माझ्या पाषानां,
ना कळे गाणे तरीही,
साथ देते माझ्या रडण्याला,
तरीही आपल्याच भावनांना का शोधतेस तू…

मगर सहमे दीलो का ओ धडकणा , बाकी आज भी है …

मगर सहमे दीलो का ओ धडकणा ,
बाकी आज भी है …

रुसवा कूच कसमे है,
और बाकी है कई साये,
अनकही कूच आहते है,
और बाकी है कई राहे,
मगर सहमी आंखो का ओ पानी,
बाकी आज भी है…

छुटे कूच रिश्ते है,
और तुटे है कई नाते,
अनकही कूच बाते है,
और बाकी है कई यादे,
मगर सहमे दीलो का ओ धडकणा ,
बाकी आज भी है… 

अजून माणूस भेटत नाही …

अजून माणूस भेटत नाही … 

माणसं खूप भेटली,
निवडणुकीच्या भाषणात भेटली,
ऑफिसातल्या कामात भेटली, 
हॉस्पिटलाच्या बिलात भेटली, 
खेळातल्या राजकारणातही भेटली, 
फक्त माणसं भेटली,
पण अजून माणूस भेटला नाही … 

माणसं खूप भेटली,
स्वतःच्या गरजेत नसलेली लाज सोडताना,
स्वतःच्या स्वार्थात नसलेली नाती जोडताना,
दुसऱ्याच्या गरजेत त्याचीच लाज काढताना,
दुसऱ्याच्या नात्यात स्वतःचा परमार्थ शोधताना,
फक्त माणसं भेटतात,
पण अजून माणूस भेटत नाही …

माणसं खूप भेटली,
संतांच्या सहवासात ही भेटली,
ग्रंथांच्या ओवीत ही भेटली ,
धर्माच्या शिकवणीत ही भेटली,
पुराणातल्या गोष्टीत ही भेटली,
फक्त माणसं भेटली ,
पण अजून माणूस भेटला नाही …

माणसं खूप भेटली,
जळी स्तळी पाषाणी अंन आभाळी ही भेटली,
हवे तेव्हा नको तेव्हा अंन नकळत ही भेटली,
खूप वेळा भेटली अंन अजूनही भेटतात,
फक्त माणसं भेटतात,
पण अजून माणूस भेटत नाही …

माझ्यातही अंन कुणातही,
फक्त माणसं भेटतात,
पण अजून माणूस भेटत नाही …

जीते मरते रहते युही , खामखा जान डालना जरुरी तो ना था ...

जीते मरते रहते युही हम, 
खामखा जान डालना जरुरी तो ना था ...

उजड़ी हुई बस्ती में चिराग जलाना जरूरी तो ना था 
बुझते हुये ख्वाबो को जन्नत दिखाना जरुरी तो ना था 
जीते मरते रहते युही हम 
खामखा जान डालना जरुरी तो ना था 

बोल तो तुम थे, 
शायर हम बन गए, 
सफ़र तो तुम थे,
मंजिल हम बन गए,
सहेर तो तुम थे,
चाँद हम बन गए,
पैमाने तो तुम थे,
और मैफिल हम बन गए ..

ज़हर का घोट पी भी लेते हम ,
और हर दर्द को जी लेते हम ,
इश्क की बला सह भी लेते हम ,
और कभी कभी ,
आंसू रेत पे गिरने देते हम ,
जीते मरते रहते युही,
खामखा जान डालना जरुरी तो ना था ...

असर तुम्हारा ही था,
जो आज भी साँस लेता हूँ ,
मेहर तुम्हारा ही था,
जो आज भी गीत गाता हूँ ,
दुवा तुम्हारी ही थी,
जो आज भी प्यार पाता हूँ ,
चाहते तुम्हारी ही थी शायद,
जो याद तुम्हे ही करता हूँ ...

पैदायशी बदनाम जी लेते हम ,
कब्र की ख़ामोशी सह लेते हम ,
जीते मरते रहते युही ,
खामखा जान डालना जरुरी तो ना था ...

आगाज तो तुमने किया,
अब अंजाम हम बन जायेंगे ,
इश्क तो तुमने भी किया,
अब मिसाल हम बन जायेंगे,
रास्ता तो तुमने किया,
अब मंजिल हम बन जायेंगे ,
इबादत तो तुमने भी की ,
पर खुदा हम बन जायेंगे ...

बिघडे हुए रावन में राम जगाना जरूरी तो ना था ,
बुझते हुये सपनोको को प्यार दिखाना जरुरी तो ना था,
जीते मरते रहते युही हम ,
खामखा जान डालना जरुरी तो ना था ....

बालपणा तू ये ना … अंन जगलेले ते क्षण पुन्हा उरी भरू दे ना …

बालपणा तू ये ना … 
अंन जगलेले ते क्षण पुन्हा उरी भरू दे ना … 

बालपणा… आठवतंय!
तू रडू रडू डोळ्यांना,
हसण्याचा आनंद दिला,
तू धडधड धडधड श्वासांना, 
नात्याचा मुका दिला, 
तू लटपट लटपट पावलांना,
बाबाचा हाथ दिला, 
अंन बोबड्या बोबड्या ओठांना,
आई हा शब्द दिला…

बालपणा तू ये ना …
अंन जगलेले ते क्षण पुन्हा उरी भरू दे ना …

बालपणा… आठवतंय!
मुळू मुळू रुसणारी, ऐकताच घंटा शाळेची,
अन खुदकन नाचणारी, ऐकताच घंटा खेळाची,
अर्ध्या तासाच्या डावासाठी, दिवसभर जगणारी,
हरलेच कधी चुकून तर झोपताच विसरणारी,
अंन दिवाळीच्या सुटीत फक्त क्रिकेट खेळणारी…

बालपणा तू ये ना …
अंन जगलेले ते क्षण पुन्हा उरी भरू दे ना …

बालपणा… आठवतंय!
आला चारमाहीचा निकाल,
म्हणून मायेचा पदर शोधणारी ,
मित्र पाचवा आला पण मी तिसरा,
म्हणून बाबांचा मार चुकवणारी,
अंन भेटताच आम्ही दोघे संध्याकाळी,
दुसऱ्याच्या गालावरची बोटे मोजणारी …

बालपणा तू ये ना …
अंन जगलेले ते क्षण पुन्हा उरी भरू दे ना …

बालपणा… आठवतंय!
असंच एकट नदी काठी रमण,
असंच एकट पावसात चिंब होण,
असंच एकट मनसोक्त गुनगुनन,
अन असंच एकट देवळात माथं टेकवण …

ना कमावल्याचा आनंद ना गमवाल्याच दुख्ख ,
ना भविष्याची चिंता ना भूतकाळाच ओझं,
ना हसण्याची ओढ ना रडण्याची भीती,
ना अस्तित्वाची जाणीव अंन ना नसल्याची उणीव …

बालपणा तू ये ना …
अंन जगलेले ते क्षण पुन्हा उरी भरू दे ना …

बालपणा …
जायचेच होते तुला तर तू आलास का?
साचणारचं होत डबक तर तू झरा दाखवलास का?
मोडायचाच होता तुला डाव तर तू मांडलास का?
अंन फक्त आठवणीतच रहायचं होत तर तू आयुष्यात आलास का …

तरीही!
बालपणा तू ये ना …
अंन जगलेले ते क्षण पुन्हा उरी भरू दे ना …

अंन माझंही जगणं कारणी लागू दे…

अंन माझंही जगणं कारणी लागू दे… 

अजून नवीन काहीतरी पुन्हा होऊ दे, 
हसू नवीन ओठी पुन्हा खुलू दे,
शब्दांच्या नवीन गाठी पुन्हा जुळू दे, 
जगण्याची नवीन पहाट पुन्हा होऊ दे, 
अंन माझंही जगणं कारणी लागू दे… 

चुकणारे ठोके पाहताच तुला,
नसलीस समोर तर शोधणारे तुला,
भेटलेच चुकून कधी डोळे तर लाजणारे तुला,
अंन झालाच स्पर्श नकळत तर साठवणारे तुला…

नभीची सर हृदयी पुन्हा वाहू दे,
अडकलेला श्वास मनी पुन्हा भरू दे,
अशीच साथ कायम दिली तर,
माझंही जगणं कारणी लागू दे …
अंन माझंही जगणं कारणी लागू दे…

डोक्यातली गर्दी रुसणारी,
पाहताच तुला,
स्वप्नांचा गाभारा सजवी,
मागताच तुला,
हसू अंन रडू हि एक होती
साद देताच तुला,
अंन उबर्यातले ही श्वास परतती,
साथ हाकेची देताच तुला…

अजून नवीन काहीतरी पुन्हा होऊ दे ,
हसू नवीन ओठी पुन्हा खुलू दे ,
शब्दांच्या नवीन गाठी पुन्हा जुळू दे ,
जगण्याची नवीन पहाट पुन्हा होऊ दे ,
अंन माझंही जगणं कारणी लागू दे…

भेटलाच चुकून कधी, तर ओळखशील ना मला!

I truly miss all my old friends that just drifted away...
This is dedicated to them...

भेटलाच चुकून कधी,
तर ओळखशील ना मला!

शाळेच्या त्याच परीक्ष्या,
सुट्टीची एकच आशा ,
गोट्यांचा तसाच डाव,
जिंकण्याचा तसाच आव,

हसणेही तेच ओठी,
अंन त्याच नदीच्या काठी,
भेटलाच चुकून कधी,
तर ओळखशील ना मला !

केलेलं पहिल प्रेम,
बेधुंद झालेलं मन,
दोस्तांच्या आग्रहा पोठी,
घेतलेला पहिला पण,
अन जगलेला एक एक क्षण!

घेऊनि आशा मोठी,
पुन्हा त्याच रस्त्याच्या वाटी,
भेटलाच चुकून कधी,
तर ओळखशील ना मला !

कामाची एकच गडबड,
स्वप्नांची तशीच लुडबुड,
मालकाचा एकच तोरा,
घरच्यांचा तोच घेरा,

जरी चुकलास कधी तू वाट,
घातला कुणीही घाट,
भेटलाच चुकून कधी,
तर ओळखशील ना मला!

जगण्याच्या गर्दी मध्ये,
स्वप्नांच्या धुंदि मध्ये,
हसण्याच्या गुर्मी मध्ये,
आनंदाच्या ऊर्मी मध्ये,

भेटलाच चुकून कधी,
तर ओळखशील ना मला!

पुन्हा तेच जगण…

पुन्हा तेच जगण… 

एक मत !
एक नेता ! 
एक आशा !
अन फ़क्त एकच अभिलाषा … 

एक सुंदर गाव !
सगळ्याच्या ओठी नाव !
जगतो आनंदाने !
गातो उरी मनाने !
स्वप्नांच्या ही भेटी !
पाहतो उघडया डोळ्यांनी !
आकाश ही धुंद होई !
माझ्या गावी असण्याने…

मग एक घात !
मग अजून एक आघात !
मग एकच निराशा !
मग अजून तोच तमाशा…
मग पुन्हा हरण
मग अजून पुन्हा विसरण …

मग?
पुन्हा …

तेच मत !
तोच नेता !
तीच आशा !
अन तशीच अभिलाषा…

शेवटी पुन्हा तसच जगण अन मरण ही…….

अंन असंच आयुष्य संपू नये …

अंन असंच आयुष्य संपू नये …

वाट चुकू नये,
मोहर हरपू नये,
फुल कोमजू नये,
स्वप्न हि विरु नये,
अंन असंच आयुष्य संपू नये …

मैत्री सुटू नये,
विश्वास गमवू नये,
वेडेपण हरवू नये,
प्रेम हि विसरू नये,
अंन असंच आयुष्य संपू नये …

क्षितीज दूर जाऊ नये,
पाऊस राग मानु नये,
नात कधी तुटू नये,
जगणं ही विसरू नये,
अंन असंच आयुष्य संपू नये…
अंन असंच आयुष्य संपू नये…

माझ्या मातीचा वास …

माझ्या मातीचा वास …

पाऊस आज इथे ही आला,
अन तिथंही…
पण मातीचा तो वास नाही आला,
माझ्या मातीचा वास …

इथ ही पोर नाचली,
अन तिथंही…
इथ ही धरती हसली,
अन तिथंही…

सूर्याच लपन इथे ही आहे,
अन तिथंही ,
ढगांची गर्दी इथे ही आहे,
अन तिथही …

पण मातीचा तो वास नाही आला,
माझ्या मातीचा वास …

एक गाव माझे होते!

आवडले जे मजला मी तुजला कसे सांगु,

सुटली जी गाठ ती मी कशी बांधू,

स्याप्नांच्या हि पलीकडे,

एक जीवन सुंदर होते,

आकाशाच्या हि पलीकडे,

एक गाव माझे होते!

एक गाव माझे होते!