पाखराचे शब्द माझे,
वेड्या मना कळणार का,
सागराचे गीत माझे,
वेड्या मना गाणार का …
आभाळाचे स्वप्न माझे
वेड्या मना जगणार का,
आठवणीचे गाव माझे,
वेड्या मना रमणार का…
भावनांचे शेत माझे,
वेड्या मना कसणार का ,
विश्वासाचे दिवे माझे,
वेड्या मना पेटणार का…
आसवांचे स्वर माझे,
वेड्या मना रुसणार का,
दगडांचे देव माझे,
वेड्या मना पूजणार का …
वेड्या मना कळणार का,
सागराचे गीत माझे,
वेड्या मना गाणार का …
आभाळाचे स्वप्न माझे
वेड्या मना जगणार का,
आठवणीचे गाव माझे,
वेड्या मना रमणार का…
भावनांचे शेत माझे,
वेड्या मना कसणार का ,
विश्वासाचे दिवे माझे,
वेड्या मना पेटणार का…
आसवांचे स्वर माझे,
वेड्या मना रुसणार का,
दगडांचे देव माझे,
वेड्या मना पूजणार का …
No comments:
Post a Comment