Thursday, 8 May 2014

न भांडता एक दिवस...देवाशी बोलायचंय!

चालत चालत रस्ता,
कुठे तरी थांबायचंय,
न भांडता एक दिवस,
देवाशी बोलायचंय….

रमून खूप झालं,
हसून खूप झालं,
पळून खूप झालं,
दमून खूप झालं,
आता कुठे तरी थांबायचंय,
चालत चालत रस्ता,
एकदा तरी आस्तित्व शोधायचंय …


पावसाची सर वाहून कधीच गेली,
मातीचा गंध हरपून कधीच गेला,
चंद्राची कोर,
बैल गाढीची ओढ,
संपून कधीच गेली!

रडून ही खूप झालं,
चिडून ही खूप झालं,
चुकून ही खूप झालं,
मरून ही खूप झालं,
आता कुठे तरी थांबायचंय,
चालत चालत रस्ता,
एकदा तरी स्वतःला शोधायचंय …


पैक्याशी मैत्री जेव्हा झाली,
नात्यांची ओढ तेव्हाच गेली,
पापाशी दोस्ती जमली जेव्हा,
देवाशी गट्टी झालीच तेव्हा,

कमावून ही खूप झालं,
दाखवून ही खूप झालं,
एकटपण खूप झालं,
अन हारणं ही खूप झालं…
आता कुठे तरी थांबायचंय,
चालत चालत रस्ता,
एकदा तरी स्वतःला शोधायचंय …

चालत चालत रस्ता,
कुठे तरी थांबायचंय,
न भांडता एक दिवस,
देवाशी बोलायचंय….


No comments:

Post a Comment