Friday, 29 January 2016

थांबलोय मी…

थांबलोय मी,
खरंच थांबलोय मी,
जायचं असतं तर गेलो असतो कधीच,
पण आजही,
थांबलोय मी…

जुळायलाच हवय गणित,
असा ध्यास  नव्हताच कधी,
भरायलाच हवेत रंग,
असं चित्रही काढलंच नाही कधी,
जगन खरंच जगन होईल,
आयुष्य खूपच सुंदर होईल,
असा ध्यासही माझा नव्हताच कधी,

तरीही थांबलोय मी,
खरंच थांबलोय मी,
जायचं असतं तर गेलो असतो कधीच,
पण आजही,
थांबलोय मी…

वाट शोधली असती,
तर मिळाली असते बहुतेक,
मोजली असती पावले,
तर खुणा सापडल्या असत्या बहुतेक,
पायांचं चालन अन चालत वाट शोधण,
जमलं असतं बहुतेक,

तरीही थांबलोय मी,
खरंच थांबलोय मी,
जायचं असतं तर गेलो असतो कधीच,
पण आजही,
थांबलोय मी…

No comments:

Post a Comment