Thursday, 28 January 2016

नाळ मैत्रीची तुटणार नाही …

कितीक येती हसून जाती ,
मनात सारे रुतून जाती ,
जरी सजवला आसमंत सारा ,
तरीही श्राध्द घालून जाती ….

कुणास ना हे कधी कळावे ,
उरलेच होते जे श्वास माझे,
घरट्याचे हि कुंपण फाटले,
आभाळाचे छत्र  हाटले,

लपवत फिरतो आज ही मित्रा ,
एक मैत्रीचा ध्यास वेगळा ,
चुकून कधीतरी तुला कळावा,
मैत्रीचा तो गोड गारवा …

चुकुदे गणित आज जगाचे ,
मोडूदेत हाथ आज मापाचे ,
उंबर्यावर जे सांडले थोडे ,
दाने ते आपल्याच प्रेमाचे ….

वाट पाहुनी थकणार नाही,
काम ते माझे सोडणार नाही,
हसुदे कुणीही मनसोक्त मित्रा ,
नाळ मैत्रीची तुटणार नाही …



No comments:

Post a Comment