Tuesday, 24 December 2013

पुन्हा तेच जगण…

पुन्हा तेच जगण… 

एक मत !
एक नेता ! 
एक आशा !
अन फ़क्त एकच अभिलाषा … 

एक सुंदर गाव !
सगळ्याच्या ओठी नाव !
जगतो आनंदाने !
गातो उरी मनाने !
स्वप्नांच्या ही भेटी !
पाहतो उघडया डोळ्यांनी !
आकाश ही धुंद होई !
माझ्या गावी असण्याने…

मग एक घात !
मग अजून एक आघात !
मग एकच निराशा !
मग अजून तोच तमाशा…
मग पुन्हा हरण
मग अजून पुन्हा विसरण …

मग?
पुन्हा …

तेच मत !
तोच नेता !
तीच आशा !
अन तशीच अभिलाषा…

शेवटी पुन्हा तसच जगण अन मरण ही…….

No comments:

Post a Comment