Tuesday, 24 December 2013

होऊ देत रिकामं थोडं पावलांचं ऒझ …

होऊ देत रिकामं थोडं पावलांचं ऒझ … 

मावळत्या किराणा सोबत,
पाखरांच्या घरट्या सोबत,
नदीच्या विसावलेल्या किनाऱ्या सोबत,
अंन श्वासातल्या हरएक घोटा सोबत,
होऊ देत रिकामं थोडं पावलांचं ऒझ … 

आईच्या हाथाची चव अजून ही तशीच,
बाबाच्या एका बोटाचा आधार अजून ही तसाच,
मैत्रीच्या ओलाव्याची ओढ ही तशीच ,
आपल्यांच्या विरहाचा बंध ही तसाच,
मग होऊ देत रिकामं थोडं पावलांचं ऒझ …

अजूनही चाखणारी पावसाचे थेंब धरा तशीच,
खाळोखात आनंदी नाचणारा काजवाही तसाच ,
गन्धानी मधहोश होणारा भवरा ही तसाच ,
दिव्या सोबत अजूनही फक्त जळणारा परवाना तसच…
मग होऊ देत रिकामं थोडं पावलांचं ऒझ …

पण का आज कमवायची ओढ हि तशीच,
का दूर देशी रमण्याचा ध्यास हि तसाच,
का कोण आहे कोण गेले विचार नाही कसलाच,
का मी आहे अन राहणार तसाच…
मग होऊ देत रिकामं थोडं पावलांचं ऒझ …

आठवणीतल्या बाबा सोबत,
हरवणाऱ्या आई सोबत,
पावसाच्या हरएक थेंबा सोबत,
अंन जगलेल्या प्रत्येक क्षणा सोबत,
होऊ देत रिकामं थोडं पावलांचं ऒझ …

No comments:

Post a Comment