अंन माझंही जगणं कारणी लागू दे…
अजून नवीन काहीतरी पुन्हा होऊ दे,
हसू नवीन ओठी पुन्हा खुलू दे,
शब्दांच्या नवीन गाठी पुन्हा जुळू दे,
जगण्याची नवीन पहाट पुन्हा होऊ दे,
अंन माझंही जगणं कारणी लागू दे…
चुकणारे ठोके पाहताच तुला,
नसलीस समोर तर शोधणारे तुला,
भेटलेच चुकून कधी डोळे तर लाजणारे तुला,
अंन झालाच स्पर्श नकळत तर साठवणारे तुला…
नभीची सर हृदयी पुन्हा वाहू दे,
अडकलेला श्वास मनी पुन्हा भरू दे,
अशीच साथ कायम दिली तर,
माझंही जगणं कारणी लागू दे …
अंन माझंही जगणं कारणी लागू दे…
डोक्यातली गर्दी रुसणारी,
पाहताच तुला,
स्वप्नांचा गाभारा सजवी,
मागताच तुला,
हसू अंन रडू हि एक होती
साद देताच तुला,
अंन उबर्यातले ही श्वास परतती,
साथ हाकेची देताच तुला…
अजून नवीन काहीतरी पुन्हा होऊ दे ,
हसू नवीन ओठी पुन्हा खुलू दे ,
शब्दांच्या नवीन गाठी पुन्हा जुळू दे ,
जगण्याची नवीन पहाट पुन्हा होऊ दे ,
अंन माझंही जगणं कारणी लागू दे…
अजून नवीन काहीतरी पुन्हा होऊ दे,
हसू नवीन ओठी पुन्हा खुलू दे,
शब्दांच्या नवीन गाठी पुन्हा जुळू दे,
जगण्याची नवीन पहाट पुन्हा होऊ दे,
अंन माझंही जगणं कारणी लागू दे…
चुकणारे ठोके पाहताच तुला,
नसलीस समोर तर शोधणारे तुला,
भेटलेच चुकून कधी डोळे तर लाजणारे तुला,
अंन झालाच स्पर्श नकळत तर साठवणारे तुला…
नभीची सर हृदयी पुन्हा वाहू दे,
अडकलेला श्वास मनी पुन्हा भरू दे,
अशीच साथ कायम दिली तर,
माझंही जगणं कारणी लागू दे …
अंन माझंही जगणं कारणी लागू दे…
डोक्यातली गर्दी रुसणारी,
पाहताच तुला,
स्वप्नांचा गाभारा सजवी,
मागताच तुला,
हसू अंन रडू हि एक होती
साद देताच तुला,
अंन उबर्यातले ही श्वास परतती,
साथ हाकेची देताच तुला…
अजून नवीन काहीतरी पुन्हा होऊ दे ,
हसू नवीन ओठी पुन्हा खुलू दे ,
शब्दांच्या नवीन गाठी पुन्हा जुळू दे ,
जगण्याची नवीन पहाट पुन्हा होऊ दे ,
अंन माझंही जगणं कारणी लागू दे…
No comments:
Post a Comment