अजून माणूस भेटत नाही …
माणसं खूप भेटली,
निवडणुकीच्या भाषणात भेटली,
ऑफिसातल्या कामात भेटली,
हॉस्पिटलाच्या बिलात भेटली,
खेळातल्या राजकारणातही भेटली,
फक्त माणसं भेटली,
पण अजून माणूस भेटला नाही …
माणसं खूप भेटली,
स्वतःच्या गरजेत नसलेली लाज सोडताना,
स्वतःच्या स्वार्थात नसलेली नाती जोडताना,
दुसऱ्याच्या गरजेत त्याचीच लाज काढताना,
दुसऱ्याच्या नात्यात स्वतःचा परमार्थ शोधताना,
फक्त माणसं भेटतात,
पण अजून माणूस भेटत नाही …
माणसं खूप भेटली,
संतांच्या सहवासात ही भेटली,
ग्रंथांच्या ओवीत ही भेटली ,
धर्माच्या शिकवणीत ही भेटली,
पुराणातल्या गोष्टीत ही भेटली,
फक्त माणसं भेटली ,
पण अजून माणूस भेटला नाही …
माणसं खूप भेटली,
जळी स्तळी पाषाणी अंन आभाळी ही भेटली,
हवे तेव्हा नको तेव्हा अंन नकळत ही भेटली,
खूप वेळा भेटली अंन अजूनही भेटतात,
फक्त माणसं भेटतात,
पण अजून माणूस भेटत नाही …
माझ्यातही अंन कुणातही,
फक्त माणसं भेटतात,
पण अजून माणूस भेटत नाही …
माणसं खूप भेटली,
निवडणुकीच्या भाषणात भेटली,
ऑफिसातल्या कामात भेटली,
हॉस्पिटलाच्या बिलात भेटली,
खेळातल्या राजकारणातही भेटली,
फक्त माणसं भेटली,
पण अजून माणूस भेटला नाही …
माणसं खूप भेटली,
स्वतःच्या गरजेत नसलेली लाज सोडताना,
स्वतःच्या स्वार्थात नसलेली नाती जोडताना,
दुसऱ्याच्या गरजेत त्याचीच लाज काढताना,
दुसऱ्याच्या नात्यात स्वतःचा परमार्थ शोधताना,
फक्त माणसं भेटतात,
पण अजून माणूस भेटत नाही …
माणसं खूप भेटली,
संतांच्या सहवासात ही भेटली,
ग्रंथांच्या ओवीत ही भेटली ,
धर्माच्या शिकवणीत ही भेटली,
पुराणातल्या गोष्टीत ही भेटली,
फक्त माणसं भेटली ,
पण अजून माणूस भेटला नाही …
माणसं खूप भेटली,
जळी स्तळी पाषाणी अंन आभाळी ही भेटली,
हवे तेव्हा नको तेव्हा अंन नकळत ही भेटली,
खूप वेळा भेटली अंन अजूनही भेटतात,
फक्त माणसं भेटतात,
पण अजून माणूस भेटत नाही …
माझ्यातही अंन कुणातही,
फक्त माणसं भेटतात,
पण अजून माणूस भेटत नाही …
No comments:
Post a Comment