Tuesday, 24 December 2013

आयुष्याच्या बेरजेत बाकी काहीच उरत नाही …

आयुष्याच्या बेरजेत बाकी काहीच उरत नाही … 

पाहिजे काय,
कळत काहीच नाही!
करतोय काय,
समजत काहीच नाही!
होणार आहे काय,
माहीत काहीच नाही!
अंन आयुष्याच्या बेरजेत बाकी काहीच उरत नाही … 

लागतय थोडंच,
तरीपण पोट भरत नाही !
चुकलाय रस्ता ,
तरीपण वाट सुटत नाही !
तुटली नाती ,
तरीपण दुश्मनी संपत नाही !
अंन आयुष्याच्या बेरजेत बाकी काहीच उरत नाही …

कळतंय खूप काही,
पण वळत काहीच नाही !
केलेत खूप वार त्यांनी,
तरीपण लोकांच दुखं उमजत नाही !
ऐकू येते हाक गावाची ,
तरीही पाय वळत नाहीत !
अंन आयुष्याच्या बेरजेत बाकी काहीच उरत नाही …

No comments:

Post a Comment